पाषाण :
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिननिमित्त पाषाण येथील साई चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पाषाण पंचकृषीचे पुरोहित श्री प्रभाकर ढेरे गुरुजी यांचा शुभःस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
श्री किशोर खडके गुरुजी यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले,पुरातन काळापासून पुरोहित मंदिरांमध्ये व घरोघरी जाऊन धर्म सेवा व धर्म जागरणाचे काम करत आहे पारतंत्र्याचा काळात ही पुरोहित देशभीमान जागृत ठेवण्याचे कार्य करत होते.आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमा निमित्त पाषाण परिसरातील पुरोहितांचा श्री राहुलजी कोकटे व भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांनी सन्मान केला त्या बद्दल धन्यवाद व्यक्त केले.
१५ ऑगस्ट रोजी ७८ व्या स्वातंत्र्याच्या दिनाचे औचित्य साधत आपल्या व पक्षाच्या वतिने पंचक्रोशीतील धार्मिक क्षेत्रात पौराहित्य सेवेतुन उल्लेखनीय योगदानाबद्दल काम करणाऱ्या प्रतिनिधीक स्वरुपात विशेष सन्मान आज राहुल कोकाटे यांनी माझा व इतर मांन्यवरांचा केला. माझ्या व परिवाराकडुन कोकाटे यांचे धन्यवाद. माझ्या सारख्या लहान व्यक्तिचा प्रेमाने केलेल्या सन्मान खुप भारुन टाकणारा आहे सामाजिक दृष्ट्या ही प्रक्रिया पूरक आहे आपण करत असलेले हे कार्य वाखांण्या जोगे आहे,सर्व शब्दात मांडणे कठिण आहे.
सांप्रदायिक क्षेत्रातील आपल्या बरोबरच्या स्नेहाचा असा सन्मान झालेला परमस्नेही भाऊ चेहऱ्यावरील आनंद न सांगता येणारा आहे.असो राहुल कोकाटे यांनी आयोजन केलेले कार्यक्रम व त्यांच्यातील सुसूत्रता अतिशय कौतुकास पात्र आहे अशा भावना हभप विनायक कुलकर्णी (आप्पा) यांनी सन्मान झाल्यामुळे भारावून जात केला.
श्री श्रीपाद कुलकर्णी, श्री सुमित ढेरे, श्री आप्पा कुलकर्णी, श्री महेश सहस्रबुद्धे, श्री मधुकर भाट, श्री शिवकुमार पांडे आदि गुरुजींचा सन्मान करण्यात आला तर श्री विनोद पेंढारकर श्री रत्नाकर माणकर श्री हरिभाऊ कोकाटे श्री शीव पांडे यांनी सर्वांना सन्मानित केले.
मयुरी कोकाटे व राहुल कोकाटे यांनी सर्वांचे आभार मानले तर श्री गिरीश चोक व किशोरजी मोरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..