May 17, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सुस गावातील शिवबा चौकातून जाणाऱ्या ड्रेनेजलाइनचे काम सुरू, माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या प्रयत्नामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार…

सुसगाव :

सुस गावातील शिवबा चौकातून जाणाऱ्या ड्रेनेजमधील सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ड्रेनेज मधील पाणी परिसरातील मारुती मंदिर आणि शाळेच्या आवारात जात असल्याने शाळेतील विद्यार्थी, नागरीक आणि परिसरात राहणाऱ्या नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबुराव चांदेरे यांनी तत्परता दाखवत पुणे महानगर पालिकेच्या माध्यमातून तातडीने या ड्रेनेजलाइनचे काम करुण घेत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

 

ड्रेनेजमधील सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ड्रेनेज मधील पाणी सर्वत्र पसरत दुर्गंधी वाढून नागरिकांचे आणि शाळेतील मुलांचे तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात आले होते. माजी स्थायी समिती अध्यक्ष मा.बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून काम सुरू झाल्याने नागरीकांना दुर्गंधी पासून दिलासा मिळाला आहे.