November 24, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वरवाडीत पारंपारिक संस्कृतीचे जतन, महिलांनी केला श्रीयाळशेठ यांचा उत्सव साजरा..

सोमेश्वरवाडी :

सोमेश्वरवाडी येथे नागपंचमी च्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळशेठ यांचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील महिला मुली माहेरवाशीण एकत्र येऊन मोठया उत्साहात साजरा करत आपली संस्कृती जपण्याचे काम आज हि केले जाते.

नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळशेठ यांची महिलांच्या हस्ते लाल मातीची मूर्ती बनवून पारंपारिक पद्धतीने पूजा करुन विसर्जन करण्यात आले. यावेळी मंगळागौर, फुगड्यांचा फेर धरत मिरवणूक काढण्यात आली.‌ दरवर्षी प्रमाणे विठ्ठल मंदिरापासून सोमेश्वर मंदिरात हि मुर्ती नेऊन पूजा केली जाते. यंदाही सोमेश्वर मंदिरात पूजा करून राम नदीत मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

श्रावण महिन्यात नागपंचमी सण महिला वर्गात मोठया उत्साहात साजरा केला जातो. यावेळी माहेरवाशीण महिला आलेल्या असतात. नागपंचमी नंतर लगेचच श्रीयाळशेठ यांचा उत्सव साजरा केला गेला.