November 22, 2024

Samrajya Ladha

पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील मुलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : समीर चांदेरे (युवक अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)

पुणे :

मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागातील जवळपास ३०० ते ४०० विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील घोले रस्त्यावर असणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील अस्वच्छतेमुळे डेंग्यू झाल्याने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सहकाऱ्यांसह वसतिगृहातील स्वच्छता, जेवण व्यवस्था आणि व्यवस्थापनाची पाहणी केली.

याबद्दल माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी सांगितले की, वसतिगृहाला पूर्ण वेळ आणि संपूर्ण प्रभार असलेला रेक्टर नसल्याचे येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना कळले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पुणे मनपा आयुक्त डॉ.भोसले साहेब यांना विनंती करणार आहे.

पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात ३००-४०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची अशी बकाल अवस्था असणे ही लज्जास्पद बाब असल्याने, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मा.अजितदादा पवार यांची तातडीने भेट घेवून वसतीगृहामधे विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा अद्ययावत करुन वसतीगृहाच्या व्यवस्थापनासाठी पूर्ण वेळ रेक्टर नेमण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचा विश्वास यावेळी समीर चांदेरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी श्रीधर स्वामी, प्रसाद चौघुले, निखिल शर्मा,लावण्यताई शिंदे,शीतल ताई येनपुरे,सुरज गायकवाड,उम्नेष काळभोर,ऋषिकेश थोरवे,कुलदीप शर्मा,विशाल सकट,विशाल चौघुले ,गणेश झांबरे,श्वेता ताई मिस्त्री उपस्थित होते.