June 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-औंध येथे कॅन्सर स्क्रिनिंग शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

बाणेर :

वामा वुमेन्स क्लब च्या अध्यक्षा सौ पूनम विशाल विधाते, मा. गंधाली देसाई, लायन्स क्लब ऑफ पुणे अशोकनगर व वामा वूमेन्स क्लब यांच्या पुढाकाराने ‘ब्रेस्ट कॅन्सर तपासणी’ शिबिराचे आयोजन डॅा तेज्वसिनी भाले यांच्या प्रकृती आयुर्वेदा पंचकर्म क्लीनिक औंध-बाणेर मध्ये करण्यात आले होते. या शिबिरास महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेत तपासणी करून घेतली.

 

भारतात महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो तो स्तनांचा कॅन्सर. भारतात गेल्या 20 वर्षांत स्तनांच्या कॅन्सरने ग्रस्त महिलांची संख्या वाढतेय. त्यासाठी सर्वच पातळीवर जनजागृती होणे महत्वाचे आहे म्हणूनच महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता या ‘ब्रेस्ट कॅन्सर तपासणी’ शिबिराचे आयोजन केले होते. महिला स्वतःच्या आरोग्यासाठी पुढे येत आहेत हि समाधानाची बाब आहे : सौ पूनम विशाल विधाते(अध्यक्ष वामा वुमेन्स क्लब)