September 12, 2024

Samrajya Ladha

९ ते ११ ऑगस्ट दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा सनीज वर्ल्ड येथे होणार..

पुणे :

‘सोमेश्वर फाऊंडेशन’ आणि ‘क्रीडा जागृती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातील एकुण १९० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथे ९ व १० ऑगस्ट २०२४ या कालावधीत रंगणार आहे.

 

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज वर्ल्डचे संचालक सनी निम्हण यांनी सांगितले की, “ही स्पर्धा पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली आणि मुश्ताक बॅडमिंटन अकादमी यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. तसेच, हि स्पर्धा ११, १३, १५, १७, १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी व १७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात होणार आहे. स्पर्धेत सुमारे ५००००/- रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत वेदांत मोरे,अर्चित खान्देशे, मीर शहजार अली, आतिक्ष अग्रवाल, आरुष अरोरा, वरद लांडगे, श्रेयस मसलेकर, हृग्वेद भोसले, इशान आगाशे, दिविशा सिंग, कियारा साखरे, ख्याती कात्रे, समन्वय धनंजय, सिया बेहेडे, सिद्धी जगताप या मानांकित खेळाडूंचा समावेश असल्याचे निम्हण यांनी सांगितले.