September 12, 2024

Samrajya Ladha

सुसगावातील स्मशानभूमीवरील गळके पत्रे बदलण्यास सुरुवात, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा पाठपुरावा..

सुसगाव :

सुसगावातील स्मशानभूमी वर असणाऱ्या पत्र्याच्या शेड पावसामुळे खराब झाल्याने पावसात गळू लागले होते. अंत्यविधी साठी येणाऱ्या नागरिकांना, ग्रामस्थांना याचा नाहक त्रास होत होता. याची दखल घेत माजी नगरसेवक/स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी महापालिका प्रशासनासी संपर्क साधत तात्काळ गळणारे २० पत्रे बदलण्यासाठी पाठपुरावा केल्याने स्मशान भूमी वरील पत्रे बदलण्याचे काम सुरू झाले.

 

पावसाळ्याचे दिवस असल्याने अंत्यविधी, दशक्रिया विधी साठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची दखल घेत चांदेरे यांनी सदर काम त्वरित होईल यासाठी पाठपुरावा केल्याने काम सुरू झाल्याने सुस गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.