September 12, 2024

Samrajya Ladha

औंध येथे कचरा समस्येमुळे त्रस्त नागरिक रस्त्यावर उतरताच प्रशासनाने कचरा पेटी हलवली.

औंध :

औंध कुटिर रुग्णालयासमोर पायथागणपती मंदिराच्या बाजूला महापालिकेच्या वतीने कचऱ्याची पेटी ठेवण्यात आली होती. त्यामुळे तेथे कचऱ्यामुळे घाण निर्माण झाली व त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले होते. तसेच परिसरात राहणाऱ्या रहिवाशी आजारी पडत होते. त्रस्त होऊन नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याचा इशारा औंध क्षेत्रीय कार्यालयाला दिल्यानंतर संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करत ताबडतोब कचऱ्याची पेटी हलवली.

 

या वेळी सचिन वाडेकर, भूषण शेळके, अविनाश खोले, मोहिते मामा, बिल्लूसिंग मान, संजय गायकवाड, प्रीतम ठकार, आप्पा ढमाले व परिसरातील माता बंधू-भगिनी उपस्थित होते.