September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मॉडर्न कॉलेज गणेशखिंड तर्फे साजरी झाली आचार्य पी सी रे यांची 163 वी जयंती तथा राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस..

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न कॉलेज मध्ये नुकतीच आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांची163 वी जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय रसायनशास्त्र दिवस आहे.

श्री शिवप्रसाद एम के, सचिव, विज्ञान भारती, पश्चिम केंद्र यांनी आचार्य प्रफुल चंद्र राय यांच्या जीवनपटलावर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची वैज्ञानिक दूरदृष्टी व देशभक्ती यावर विस्तृत मांडणी केली तसेच भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आचार्यांचा आदर्श ठेऊन भव्य उद्दिष्ट साध्य करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. प्राचार्य डॉ संजय खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या निमित्ताने रसायनशत्राच्या M.Sc. द्वितीय वर्षाच्या च्या विद्यार्थ्यांनी रसायन शास्त्राच्या पदवीच्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून रसायनशास्त्रावर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. यासाठी प्रमुख पाहुण्या असलेल्या पुण्याच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या डॉ. कीर्ती बडवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

श्रावणी भंडारी, साक्षी देशमुख, सुहानी पवार या विजेत्या ठरल्या. या कार्यक्रमामध्ये स्वागत प्रा. गायत्री श्रोत्रीय यांनी केले. डाॅ ऋचा पुरंदरे यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रेवती नगरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन रसायनशास्त्र विभागाने विज्ञान भारती व संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिल यांनी केले.

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ संजय खरात, रसानशस्त्र विभागप्रमुख डॉ माधुरी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे सहकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षीत आणि उपकार्यवाह सुरेश तोडकर यांनी शुभेच्छा दिल्या.

 

You may have missed