कोथरूड :
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने कोथरूड विधानसभा परिसरातील नागरिकांसाठी कोथरूड नाट्य महोत्सवाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे करण्यात आले आहे. या नाट्यमहोत्सवाची सुरुवात एका लग्नाची पुढची गोष्ट या धमाल नाटकाने झाली. पहिल्याच नाटकाला प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी करत उदंड प्रतिसाद दिला.
कोथरूड नाट्यमहोत्सव द्वारे कोथरूड विधानसभेच्या रसिक प्रेक्षकांसाठी अमोल बालवडकर यांच्या वतीने सांस्कृतिक मेजवानी मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. विविध उपक्रमाद्वारे अमोल बालवडकर यांनी कोथरूडवासीयांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कोथरूड नाट्य महोत्सवास सुरुवात झाली असून “एका लग्नाची पुढची गोष्ट” या धमाल नाटकाचा प्रेक्षकांनी आनंद घेतला. यावेळी नाट्य क्षेत्रातील एक मोठे नाव, प्रसिद्ध अभिनेते आणि सदरील नाटकातील मुख्य कलाकार मा. प्रशांतजी दामले यांनी नाट्य महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून आपल्या परंपरेला उभारी देण्याचे काम अमोल बालवडकर यांच्या वतीने सातत्याने होत असल्याबद्दल कौतुक केले.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..