बालेवाडी :
श्री खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडीच्या सी एम इंटरनॅशनल स्कुल, म्हातोबा तुकाराम बालवडकर माध्यमिक आणि जुनिअर कॉलेज त्याच बरोबर ज्ञानसागर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स च्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक त्याच बरोबर कला आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रीय शैक्षणिक विकास समिती, संसद भवन सभासद श्री शिवराज काळभोर यांच्या तर्फे गौरविण्यात आले.
ह्या प्रसंगी शिवराज काळभोर यांनी बोलताना, विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करून स्वतः च्या अंगी अभ्यासाबरोबर नेमका कोणता इतर गुण आहे तो शोधून स्वतः च्या हितासाठी त्याचा वापर करून समाज आणि देश घडविण्यासाठी कसा उपयोग करता येईल ह्याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे असं सांगितले.
युवा उद्योजक श्री अजित जाधव यांनीही विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुठल्याही परिस्थिती खचून न जाता पुढे वाटचाल करत राहिले पाहिजे असे सांगितले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर आणि सचिव डॉ सागर बालवडकर यांनी विद्यार्थ्यांना हर तर्हेने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटीबद्ध असल्याचे सांगितले. ह्या प्रसंगी पत्रकार सिकंदर शेख आणि युवा उद्योजक श्री गौरव जाधव देखील उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रोफेसर सरोज यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ प्रगतिका यांनी केले असून म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयाचे प्राचार्य श्री दत्तात्रय डफळ आणि सी एम इंटरनॅशनल च्या मुख्याध्यपिका सौ इकबाल कौर राणा उपस्थित होत्या.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..