November 22, 2024

Samrajya Ladha

६८२४८ हजार रूग्णांनी घेतला महा आरोग्य शिबिरात प्रत्यक्ष लाभ – सनी विनायक निम्हण

शस्रक्रियेसाठी नोंदणी झालेल्या रूग्णांवर पुढील दोन महिन्यात शस्रक्रिया केली जाईल

पुणे :

सोमेश्वर फाऊंडेशन तर्फे आयोजित माजी आमदार स्वर्गीय विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त (ता.२२) जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान पुणे शहरामध्ये तीन टप्यात, ३६ ठिकाणी ‘कार्यासम्राट मोफत महा-आरोग्य शिबीर” घेण्यात आले. यातील मुख्य शिबीर रविवार (ता.४) आॅगस्ट शासकीय कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर, शिवाजीनगर या ठिकाणी झाले. या शिबीरामध्ये ६८२४८ रुग्णांनी प्रत्यक्ष लाभ घेतला असून, पुढील महिनाभरात रूग्णांच्या सर्व प्रकारच्या शस्रकिया देखील पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती आयोजक सनी निम्हण यांनी दिली. शिबीरामध्ये आयुष विभाग ३५६०, दिव्यांग रुग्ण साहित्य व कृत्रीम अवयव नोंदणी ७००, सामान्य औषध ६५३३, हृदयविकार १५००, श्वसन विकार ६२०५, वृद्धत्व ६०२०, त्वचाविकार ६००८, मनोविकार ३५१, अनुवंशीक विकार २००, मेंदुविकार १२५१, कान नाक घासा ८२०५, नेत्रचिकीत्सा विभाग १००२१, सामान्य शस्त्रक्रिया ६००६, लठ्ठपणा ३५०, प्लास्टिक सर्जरी ७५०, मुत्रविकार ११००, कर्करोग ५५०, अस्थिव्यंगोपचार १००९, फिजीओथेरपी ७५२, बालविकार २०२२, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र २१५०, दंतचिकीत्सा ३००५ इत्यादी आजारावर रूग्णांनी प्रत्यक्ष उपचार घेतले. काल दिवसभर मुसळधार पाऊस असताना देखील नागरिक उपचारासाठी येत होते.
सोळा स्पेशालिटी, आठ सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील तज्ज्ञ डॅाक्टर या ठिकाणी सर्वसामान्या रूग्णांना तपासत होते. दिवसभरात सर्वपक्षीय राजकीय मंडळी, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, आजी माझी मंत्री, आमदार, खासदार, नगररसेवक, समाजिक कार्यकत्यांनी शिबीराच्या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

“जयंतीनिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम हा आबांचा सामाजिक वारसा माझा वसा म्हणून पुढे घेऊन जात आहे. समाजाला देणं लागतो ही त्यांची शिकवण आहे. त्यानिमित्त हे आरोग्य शिबीर दरवर्षी आयोजित करत आहे. त्यामध्ये सहभागी असलेले महाराष्ट्र शासन, निमसरकारी अधिकारी , प्रशासकीय अधिकारी, रूग्णालय, डॅाक्टर, पुणे महापालिका व सर्व माझे सहकारी व निम्हण कुटुंबीयांचे मी मनापासून आभार मानतो.”- आयोजक, सनी विनायक निम्हण