पुणे विद्यापीठ :
क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन, देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता प्राणाची आहुती दिली.अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतिदिन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेत साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक निलेशजी भिसे यांचे स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान यावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मी सत्कारणी लावीन असा संकल्प विद्यार्थ्यांना करायला लावून छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या विविध गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांनी क्रांती दिनानिमित्त पोवाडा सादर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी तर पाहुण्यांचा परिचय गौरी गोळे यांनी केला. क्रांती दिन, नागपंचमी, श्रावणी शुक्रवार अशा त्रिवेणी संगम असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागपंचमीची शास्त्रीय माहिती वैशाली सैंधाणे यांनी तर श्रावणी शुक्रवारचे महत्व संध्या आवेकर यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे निलेशजी भिसे व प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या हस्ते शिक्षण विवेक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा देवकाते यांनी तर आभार प्रमोदिनी कबुले यांनी मानले. यावेळी स्नेहा वाघमारे, स्मिता जाधव, तेजस्विनी निरगुडे, मनोहर निकम, योगेश्वर चव्हाण, प्रिया बिरजे,पल्लवी अभंग, रेश्मा पुरी, मंदाकिनी काशीद, दीपक आगवणे, चंद्रकांत कुडले व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
बाणेर-बालेवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम विधाते यांनी केली पाहणी
महाळुंगे- बालेवाडी येथील “श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलाचे” गुगल मॅप वर ‘छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ असे नाव, कारवाई करण्याची अमोल बालवडकर यांची मागणी…
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आणि पाषाण परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचा ‘मान्सून सेफ्टी ड्राईव्ह 2025’ उपक्रम..