November 22, 2024

Samrajya Ladha

सुतारवाडी स्मशानभूमीत पावसामुळे होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून समस्या सोडवावी अन्यथा आंदोलन करणार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निवेदनाद्वारे इशारा..

सुतारवाडी :

सुतारवाडी स्मशानभूमीत पावसामुळे चिखल व पाणी साचत असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना मृत्यूनंतर करण्यात येणारे धार्मिक कार्य करण्यास अडचणी निर्माण होत आहे. म्हणून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या सूचनेनुसार स्थानिक पदाधिकारी यांनी स्मशान भूमी मध्ये पाण्याचा निचरा व बसण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य नियोजन करून महानगरपालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी औंध क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्तांना दिले.

सुतारवाडी स्मशानभूमीत दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाणी व चिखल साचला जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मृत्यू नंतरचे धार्मिक कार्य करण्यास अडचण येत आहे. सदर बाब शिवसेना माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्थानिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व संबधित अधिकारी यांना पाण्याचा निचरा व बसण्याची व्यवस्थेबाबत योग्य नियोजन करण्याबाबत सुचना करण्यात आल्या. त्यांच्या सूचनेनुसार लागणार्‍या कामास हवा असलेला निधी लवकरात लवकर महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवेदनद्वारे दिला.

यासाठी विभाग प्रमुख संतोष तोंडे, उप विभाग प्रमुख दिनेश नाथ, प्रभाग प्रमुख ऋषिकेश कुलकर्णी, शिवदूत महेश सुतार आप्पा पाटील यांनी क्षेत्रीय कार्यालय अधिकारी गिरीश दापकेकर यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले.