September 17, 2024

Samrajya Ladha

बाणेर बालेवाडी परिसरातील महिलांनी मुळा नदी माईची खणा नारळाने भरली ओटी, माई नको सोडू तुझे नदी पात्र केली मनोभावे प्रार्थना..

बाणेर :

बाणेर बालेवाडी परिसरातील महिलांनी परिसरातून प्रवाहित असणाऱ्या मुळा नदी माय ची खणा नारळाने ओटी भरून नदी माईला आपले नदी पात्र सोडू नये अशी मनोभावे प्रार्थना करुण मुसळधार पावसाने नदीला पूर येऊन देखील कोणतीही जीवित आणि वित्त हानी नाहि झाली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली.

२५ जुलै रोजी सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर आला. मुळा नदीचा प्रवाह हा बाणेर बालेवाडी भागातून जात असल्याने आलेल्या पुराचे पाणी बाणेर बालेवाडी भागातील वाड्या वस्त्या व सोसायट्यामध्ये शिरले त्यामुळे नागरिकांची प्रचंड वाताहत झाली व नुकसान झाले. परंतू समाधानाची बाब म्हणजे कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही. म्हणुनच महिलांनी एकत्र येऊन मुळा माई ची खणा नारळाने ओटी भरुन प्रार्थना केली की ये मुळा माई आम्ही सर्व तुझी लेकरे असून तु तुझे पात्र सोडू नकोस आमच्यावर तुझी कृपा असुदे.

खर तर पूर्वीपासून आपल्याकडे पाऊस झाला की नदी माईचे खणा नारळ ने ओटी भरून पूजन करण्याची पद्धत होती. याच परंपरांची, संस्कृतीची जाण ठेवून महिलांनी खणा नारळाने ओटी भरून मुळा माई नदीचा सन्मान करत पूजन केले.