November 21, 2024

Samrajya Ladha

सुसगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त दिलीप मुरकुटे यांच्या वतीने ३२ महिला भगिनींचा ‘महिला सन्मान पुरस्कार’ देउन गौरव..

सुसगाव :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने सुस गावातील कर्तुत्वान महिलांना ३२ महिला भगिनींना कोल्हापूरच्या अंबाबाईदेवीची प्रतिमा देऊन ‘महिला सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी प्रास्ताविक करताना शिवसैनिक संस्थापक अध्यक्ष बाणेर नागरी पतसंस्था डॉ. दिलीप मुरकुटे पाटील म्हणाले की, माजी मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाला भक्कम सांभाळणाऱ्या सुस गावातील ३२ महिला भगिनींना कोल्हापूरच्या अंबाबाईदेवीची प्रतिमा देऊन ‘महिला सन्मान पुरस्कार २०२४’ ने सन्मान करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आहे.

यावेळी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, हभप पांडुरंग अप्पा दातार, बाळासाहेब भांडे ( सदस्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे) ज्योती चांदेरे( उपशहर प्रमूख शिवसेना उबाठा महिला आघाडी कोथरुड विधानसभा), माजी सरपंच नारायण चांदेरे, ॲड. विशाल पवार, अर्जुन शिंदे, संतोष मोहोळ, राम गायकवाड, प्रशांत आबने, वसंत चांदेरे, रखमाजी पाडाळे, श्याम बालवडकर, धनंजय भोते, ॲड. सुदाम मुरकुटे, अर्जुन ननावरे, हभप नामदेव भेगडे, माजी सरपंच नामदेव चांदेरे, माजी सरपंच अंजना चांदेरे, शिवा नाईकवाडे, नितीन चांदेरे, सोमनाथ कोळेकर, चेतन दर्शने, संतोष भोसले, स्वप्नील रणवरे, सुमित कांबळे, ऋषी लोंढे, अविनाश गायकवाड, ऋषिकेश कांबळे तसेच भैरवनाथ भजनी मंडळ, ज्ञानज्योत भजनी मंडळ, ज्ञानदीप भजनी मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.