September 8, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील दत्तनगर परिसरातील राम नदी लगत संरक्षण भिंत उभारून नागरिकांना पुरा पासून दिलासा देण्याची पूनम विधाते यांची कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे मागणी

बाणेर :

बाणेर येथील सर्वे नंबर 281 व 282 दत्त नगर परिसरात राम नदी लगत संरक्षण भिंत उभारण्यात यावी अशी मागणी कोथरूड मतदार संघाचे आमदार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ. पुनम विशाल विधाते यांनी केली. यावेळी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नामदार पाटील यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.

 

याबद्दल माहिती देताना पूनम विधाते यांनी सांगितले की, बाणेर मधील दत्तनगर परिसरात बरीच कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्य आहे. पावसाळ्यात राम नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी येते. मुळा नदीला पूर आल्यानंतर त्यात सामावणाऱ्या राम नदी पात्रातील पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने पाणी दत्तनगर परिसरातील घराघरात शिरते. त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते.

म्हणूनच सौ. पूनम विधाते यांनी राम नदी लगत दत्तनगर परिसरात संरक्षण भिंत उभारल्यास नागरिकांचा पुराचा धोका कमी होणार असल्याचे नामदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देत निदर्शनास आणून दिले.

दत्तनगर येथे राम नदी बाजूने व नाल्याच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्याचे आदेश पुणे महानगरपालिका प्रशासनास द्यावे अशी मागणी यावेळी पूनम विशाल विधाते यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.