September 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल च्या सुस शाखेत 25व्या कारगिल विजय दिवसा प्रित्यर्थ जवानांना श्रद्धांजली अर्पण!!!

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेमध्ये शुक्रवार दिनांक 26 जुलै २०२४ रोजी कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सो. निर्मल पंडित व पर्यवेक्षक नेहा माळवदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांना कारगिल दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. ऑनलाईन क्लास मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कारगिल दिनाविषयी माहिती देउन विद्यार्थ्यांनी भाषणे देउन जवनांप्रती असलेला आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांना देशभक्तीपर गीते गाऊन देशाप्रती असलेली भक्ती गाण्यातून व्यक्त केली.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांनी कारगिल युद्धामधील शहीद जवानांचे देशाविषयी असलेले अपार प्रेम भक्ती व निष्ठा व्यक्त केली. सौ.मीना खडतरे मॅडम यांनी कारगिल दिनाविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले तसेच सौ रश्मी मॅडम यांनी ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत गाऊन सर्व शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली.

सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्क्रीन शेयर करुन कारगिल युद्धाचे दृकश्राव्य दाखवण्यात आले तसेच ध्वनीफीत ऐकवण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले होते. पर्यवेक्षक नेहा माळवदे व सचिन खोडके यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकगण व विद्यार्थी वर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात कारगिल दिनाचा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला . शहीद जवानांना सलामी देऊन कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रीन हाऊस कॅप्टन सौ. प्रफुल्ल पाटील यांनी केले तर कला शिक्षक श्री शिवराज सर यांनी कारगिल चा देखावा तयार केला होता.

 

You may have missed