November 21, 2024

Samrajya Ladha

अतिवृष्टीमुळे बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे भागात पूरपरिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या मदत मिळावी म्हणून विशाल विधाते यांचे प्रयत्न..

बाणेर :

अतिवृष्टीमुळे बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशाल विधाते यांनी पूर परिस्थिती निर्माण झालेल्या घटनास्थळी भेट देत आढावा घेऊन अडचणीत असणाऱ्या नागरिकांना मदत कार्य कसे पोचेल या दृष्टीनं प्रयत्न सूरु केले.

याची माहिती देताना विशाल विधाते यांनी सांगितले की, बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे मधील पूरपरिस्थितीची पाहणी केली, तातडीने प्रशासन अधिकाऱ्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली तसेच, सदर ठिकाणी तातडीने मदतकार्य सुर करण्याचे आवाहन केले आहे. या भागातील राहणाऱ्या ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे, त्यांच्यासाठी निवासाची सोय तसेच जेवणाची सोय बाणेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोपानराव बाबुराव कटके प्रशाला, बाणेर गावठाण. येथे करण्यात आली आहे. तरी कोणतीही मदत हवी असल्यास तातडीने 9881104846 या नंबर वर संपर्क करा.. !

तसेच सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, कृपया सतर्क राहा, शक्यतो घराबाहेर पडणे टाळा ! आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी अशे आवाहन विधाते यांनी केले.