September 8, 2024

Samrajya Ladha

विठू नामाच्या गजरामध्ये भव्य दिव्य पंढरपूरच्या वारीचा पालखी सोहळा पेरीविंकलमधील सुस शाखेच्या प्रांगणामध्ये संपन्न!!!!!

सूस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सुस शाखेमध्ये मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य पालखी सोहळा पेरीविंकलच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला. पेरिविंकल शाळा ही इंग्लिश मिडीयम स्कूल असली तरी पंढरीची वारी वारकऱ्यांचा ठेवा असणारी संस्कृती व संस्कार जोपासण्याचा अविरत प्रयत्न करत असते.

 

पालखी सोहळ्यामध्ये वृक्षदिंडी ,ग्रंथदिंडी काढण्यात आली. तसेच श्री संत ज्ञानेश्वर माऊली ,श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज ,श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री संत एकनाथ महाराज ,श्री संत सोपान देव महाराज ,संत मुक्ताबाई यांच्या पालख्या काढण्यात आल्या. वृक्षदिंडी मधून वृक्षाचे महत्व, ग्रंथदिंडी मधून ज्ञान संस्कार यांचे समाजप्रबोधन करण्यात आले.

पालखी सोहळ्याचा आरंभ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित,पर्यवेक्षक सचिन खोडके नेहा माळवदे मॅडम यांच्या हस्ते विठू माऊलीच्या आरतीने करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल यांनी 5000 वर्षांपूर्वीचा वारीचा इतिहास मुलांना सांगितला. शाळेच्या संचालिका सौ रेखा बांदल यांनी वारीचे महत्त्व पटवून दिले. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी डान्स आयोजित करुन विठूनामाचा गजर केला. इयत्ता सहावीच्या श्रावणी तांबिले या विद्यार्थिनीने अभंग गायले त्याला साथ सुषमा तांबिले शिक्षकेने दिली तर इयत्ता नववीतील पार्थ तांबिले या विद्यार्थ्याने पकवादाची अभंगाल साथ दिली.

प्री प्रायमरी ते बारावीपर्यंत सर्व सुमारे १००० च्या वर विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता. विठू माऊलीच्या नामाच्या गजरामध्ये पेरिविंकल ते सुसगाव काळभैरवनाथ मंदिरापर्यंत पालखी काढण्यात आली. तसेच तेथील रहिवासी अतिशय उत्साहाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले. सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला.

या संपूर्ण पालखी सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बांदल सर संचालिका सौ. रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले होते .पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थीवर्ग यांच्या मदतीने अत्यंत उत्साहात हा पालखी सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला . सर्वांनी या पालखीचा मनमुराद आनंद घेतला. प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.