May 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

वारी पेरीविंकलची, संस्कारांची ! पिरंगुट शाखेत अनोखा पालखी सोहळा संपन्न..

पिरंगुट :

आपल्या शैक्षणिक क्षेत्रात महत्वाचा ठसा उमटविणा–या पेरीविंकलच्या पिरंगुट शाखेत आज धार्मिक संस्कार, सामाजिक भान, जनजागृती, जातीय सलोखा, आणि व्यवस्थापन याचे प्रात्यक्षिक शिक्षण देणा –या वारीची महती आजच्या या पालखी सोहळ्यातून पेर्रीविंकल च्या विद्यार्थ्यांना मिळाला.

 

वारकरी संप्रदायाचा उत्साह आणि जल्लोष आज पेरीविंकलच्या पालखी सोहळ्यात पहायला मिळाला. पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड जुनिअर कॉलेज पिरंगुट शाळेत आज विद्यार्थ्यांसाठी पालखी सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. पालखी तयार करणे, त्याची सजावट रांगोळी, शाळेतील सूचना फलक, संपूर्ण शाळेच्या इमारतीची सजावट उत्साही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शना प्रमाणे आपापले सौंदर्याविष्कार दाखवत पार पाडले. नेत्र सुखद रांगोळ्यांनी मन प्रसन्न झाले. सर्वत्र फुलांची सजावट मनाला अधिकच प्रसन्नता देऊन गेली.

संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल सर, तसेच संचालिका रेखा बांदल आणि मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडले. आपल्या खास लहान दोस्तांसाठी म्हणजेच पूर्व प्राथमिक विद्यार्थी वर्गासाठी इमारती अतर्गत एका छोट्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता पहिली ते चौथीचे व पाचवी ते दहावीचे विद्यार्थी पारंपारिक वेशात पालखी सोहळ्यात सामील झाले. शाळेच्या मुख्य इमारतीपासून वाजतगाजत हा विद्यार्थीवर्ग पालखीसह विठ्ठल मंदिरात पोहोचला. मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन तसेच मंदिरातील आरती उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाला मान्यवर म्हणून बाजार समिती अध्यक्ष तुषार पवळे उपस्थित होते. गणपती आणि विठ्ठलाची आरती, मंत्रजागर, पांडुरंगाष्टकम यांचे पठन सर्व विद्यार्थ्यांच्च्या कडून करून घेण्यात आले. शाळेच्या उत्साही विद्यार्थीनिनी आपल्या शिक्षिकांसोबत फुगड्यांचा आनंद लुटला. मंदिरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. सर्व बालचमू विठ्ठल नामाचा गजर करत शाळेत परतले.

पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पल्लवी नारखेडे, यांची संपूर्ण कार्यक्रमासाठी मदत झाली. सर्व शिक्षकांनी आपापल्या जबाबदा–या योग्य पद्धतीने पार पाडत आणि विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत हातभार लावला. विठ्ठल नामाच्या उदघोशात, उर्जेच्या अनोख्या प्रदर्शनात आजचा हा पालखीसोहळा पार पडला.