October 18, 2024

Samrajya Ladha

डॉ.विद्या पाठारे हनवंते यांना उत्कृष्ट शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक पुरस्कार

सांगवी :

क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन -जिल्हा- राज्य – राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त करण्यासाठी कार्य करणाऱ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालिका डॉ.विद्या पाठारे हनवंते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक पुरस्कार’ प्राप्त झाला.

महाविद्यालय पातळी आणि विद्यापीठ स्तरावर खेळाडूंना सतत त्यांचे मार्गदर्शन असते. यामुळे क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पातळीवर अभिमानास्पद कामगिरी करण्यासाठी डॉ.विद्या पाठारे अविरत कार्यरत असतात. महाविद्यालयातील खेळाडूंनी सुवर्ण- रौप्य- कांस्य पदके पटकावली आहेत. महाविद्यालयीन ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी ,खो-खो, काया किंग, शरीर सौष्ठव फुटबॉल, बास्केटबॉल, मुष्टीयुद्ध, ॲथलेटिक्स ,सायकलिंग इत्यादी खेळामध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवलेले आहे .या सर्व बाबींची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला .

त्यांच्या या कामगिरीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ . संगीता जगताप, उपप्राचार्या डॉ.वंदना पिंपळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.