June 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे सौ पुनम विशाल विधाते यांनी वामा वुमन्स क्लबच्या अंतर्गत घेतलेल्या “द आर्ट ऑफ बेकिंग” केक आणि कुकीज बनवण्याची कार्यशाळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

बाणेर :

आज वामा वुमन्स क्लबच्या अंतर्गत कै मुक्ताबाई केशवराव तापकीर जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र साईदत्त सोसायटी बाणेर येथे खास महिलांसाठी “द आर्ट ऑफ बेकिंग” ही केक आणि कुकीज बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिलांनी उत्साहात सहभाग घेतला.

 

वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करण्याचा हेतू समोर ठेऊन विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.  “द आर्ट ऑफ बेकिंग” ही केक आणि कुकीज बनवण्याची कार्यशाळा घेऊन महिलांमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्याचा मानस आजच्या कार्यशाळेत महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे साध्य झाला याचा आनंद वाटतो : सौ पूनम विशाल विधाते(अध्यक्षा वामा वुमन्स क्लब)

यावेळी महिलांनी विविध प्रकारचे केक तसेच कुकीज शिकण्याचा आनंद घेतला. महिलांच्या उत्साहाने कार्यशाळा अधिकच रंगतदार झाली.