October 18, 2024

Samrajya Ladha

सुस शाखेच्या पेरिविंकल च्या मुलांनी अभ्यासाबरोबरच घेतले भातशेतीच्या अनुभवाचे धडे!!!

भात शेती लागवड उपक्रम

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सुस शाखेमध्ये आज शनिवार दिनांक 30 जुलै रोजी इयत्ता 9वी, 10वी व 12वी च्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता स्वतःच्या अनुभवातून शिक्षण देण्याचा आगळा वेगळा भात शेती लागवडीचा उपक्रम राबवण्यात आला. इयत्ता नववी, दहावी, बारावीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन प्रत्यक्षात भात शेतीचा अनुभव घेतला. या उपक्रमाचा शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. मूळचे नांदेगावचे निवासी श्री मांडेकर तालुका मुळशी यांच्या शेतकरी मळ्यात जाऊन पेरीविंकलचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वतः शेतीत भात लागवड (Rice-Farming) करण्याचा अनुभव घेतला. पुस्तकातील अभ्यास तर रोजच सर्व विद्यार्थी शाळेत जाऊन करत असतात पण पुस्तकापलीकडे जाऊन असे प्रात्यक्षिक ज्ञान घेण्याचा एक प्रयत्न व त्यातून येणाऱ्या अनुभवातला आनंद आज पेरीविंकलच्या सुस शाखेतील विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला.

आपल्या रोजच्या आहारात भात अविभाज्य घटक असतो. यासाठी आपला पोशिंदा भाताच्या पिकाची लावणी करतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यात आला. शेतकरी शेतात भाताच्या पिकांची कशी लावणी करतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन भाताची लावणी पेरिविंकल च्या सुस शाखेतील विद्यार्थ्यांनी व त्यांचसोबत शिक्षकांनी सुद्धा आज अनुभवली. या भातशेतीच्या क्षेत्रभेटीचे(Field-Visit) चे आयोजन शाळेच्या वेळेत स्कूल बसने विद्यार्थ्यांना घेऊन करण्यात आले होते.

या संपूर्ण भातशेती च्या (Rice-farming) च्या फील्ड व्हिसिट चे आयोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बादल सर व संचालिका सौ. रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पेरिविंकल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या नेतृत्वाने करण्यात आले होते. पर्यवेक्षक सचिन खोडके व नेहा माळवदे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकगण व विद्यार्थीवर्ग यांच्या मदतीने आजची Field-Visit अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली सर्वांनी भातशेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मनमुराद आनंद लुटला व अनुभवातून आस्वाद घेतला.