September 8, 2024

Samrajya Ladha

माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण’योजनेची अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध..

बाणेर :

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त साधून माजी नगरसेविका ज्योती कळमकर व भाजपा नेते गणेश कळमकर यांच्या वतीने बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, सूस, म्हाळुंगे भागातील महिला भगिनींसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण’ या योजने चा लाभ मिळावा म्हणून १२ जुलै ते २२ जुलै पर्यंत सकाळी १० ते ५ या वेळेत अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची सुरूवात त्यांच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात करण्यात आली.

 

राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, त्यांचे आरोग्य, पोषणात सुधारणेसाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिकांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण’ ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. जास्तीत जास्त महिला भगिनींना याचा लाभ घेता यावा. अर्ज भरताना सोपे जावे म्हणून या योजनेसाठी अर्ज भरण्याची सुविधा बाणेर येथील जनसंपर्क कार्यालयात सुरू केली असून पहिल्याच दिवशी महिलांनी मोठया उत्साहात अर्ज भरून घेतले. पुढील काही दिवसांत जास्तीत जास्त महिला भगिनींनी या संधीचा फायदा घ्यावा : ज्योती गणेश कळमकर (माजी नगरसेविका)

हि योजना आर्थिक दुर्बल घटकातील २.५० लाख उत्पन्न असणाऱ्या व २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आहे. अर्ज भरण्यासाठी माजी नगरसेविका ज्योती कळमकर व भाजपा नेते गणेश कळमकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा.