देहूगाव :
देहूगाव येथील राष्ट्रीय कबड्डी पंच व धनकवडी पुणे येथील जगन्नाथ क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ नंदकुमार काळोखे यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा यांच्या जन्मदिनानिमित्त(कबड्डी दिन) ज्येष्ठ कबड्डी पंच पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कबड्डीची आवड जोपासणारे नंदकुमार काळोखे सर वयाच्या ७०व्या वर्षी देखील मोठ्या उत्साहात मैदानावर पंच म्हणून जबाबदारी पार पडताना दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने 15 जुलै हा कबड्डी महर्षी स्वर्गीय शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिवस कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 24 व्या कबड्डी दिनी माळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉलमध्ये पुणे जिल्ह्याचे पंच नंदकुमार काळोखे सराना गेल्या ४४ वर्षात त्यांनी पंच म्हणून दिलेल्या अविरत सेवेला मानवंदना म्हणून अमृत कलश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नंदकुमार काळोखे सर हे देहू गावचे सुपुत्र असून 44 वर्ष कबड्डी क्षेत्रात पंच म्हणून काम करत आहेत. पुणे येथील हिरे हायस्कूलमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. यापूर्वी देखील त्यांनी शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच इतर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक खेळाडू घडविले तसेच लेझीम व झांज याचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. आजही पंच म्हणून काम करत असताना नवोदित पंचांना कायम मार्गदर्शन व सहकार्य करताना दिसतात. सरांचा नम्र व मनमिळावू स्वभावामुळे त्यांच्याकडे कबड्डी क्षेत्रात आदराने पाहिले जाते.
यावेळी किशोर, कुमार व खुला गट राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघातून खेळताना विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या उत्कृष्ट खेळाडूंचा शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. तसेच कबड्डी क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ता, जेष्ठ पंच, ज्येष्ठ खेळाडू, सातत्यपूर्ण स्पर्धा आयोजक व संस्था यांचा गौरव करण्यात येतो.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सेक्रेटरी दत्तात्रय झिंझुर्डे व पदाधिकाऱ्यांनी काळोखे सराना ज्येष्ट पंच पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याने आनंद व्यक्त केला.
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..