July 17, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि वसुंधरा अभियानच्या वतीने तृतीयपंथीय बांधवांच्या शुभहस्ते वृक्षारोपण..

बाणेर :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांच्या संकल्पनेतून जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आणि वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या वतीने मा. खा. सुप्रिया ताई सुळे आणि माजी राज्यसभा खासदार वंदना ताई चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तृतीयपंथीय बांधवांच्या शुभहस्ते वृक्षारोपण अभियान पार पडले.

आपल्या समाजातील उपेक्षित घटक म्हणून ज्यांना गणले जाते, अशा तृतीयपंथी समाज बांधवांकडून वृक्षारोपण करून त्यांना सामावून घेत मानाचे स्थान देण्याचा छोटा प्रयत्न केला. यावेळी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून रेशन कीटचे वाटपही करण्यात आले : जयेश मुरकुटे (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)कोथरूड)

या अभियानात बाणेर आणि परिसरात नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी गिरीश गुरनानी (अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा), सचिन यादव (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी क्रीडा सेल पुणे शहर), सारंगजी कोळेकर, पंकजजी खताने व वसुंधरा अभियानचे सर्व सदस्य आणि तसेच सर्व वयोगटातील नागरिक यात सहभागी झाले होते.

तूकाई टेकडी बाणेर, या ठिकाणी 2006 पासून ,वसुंधरा अभियान बाणेर, संस्था काम करत असून, आत्तापर्यंत संस्थेने ४६००० झाडे लावली आहेत. महाराष्ट्र शासनाने श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्कार देऊन संस्थेला सन्मानित केले आहे. या अनोख्या प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे नागरिकांतून कौतुक होत आहे.