July 17, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत शालेय साहित्य आणि रोख बक्षीस वाटप कार्यक्रम संपन्न..

बाणेर :

बाणेर येथील दत्त मंदिरात श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने बाणेर परिसरातील जवळपास १००० विदयार्थ्यांना शालेय साहित्य आणि रोख बक्षीसांचे वाटप करण्यात आले. ईयत्ता १० वी आणि १२ वी च्या प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा व्याख्याते प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘आई आणि बाप समजून घेताना” या विषयावर आणि आपली कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी बाबत महापुरुषांचे आदर्श घेऊन व्यक्तिमत्त्व विकास करण्यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अनिकेत मुरकुटे यांनी मांडले तर उपाध्यक्ष राहूल पारखे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खजिनदार वर्षा विधाते, हिशोब तपासनीस मंगेश मुरकुटे तसेच श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त/सभासद लक्ष्मण सायकर, बबनराव चाकणकर, प्रवीण शिंदे, बापूसाहेब कळमकर, विजय विधाते, हरीश कळमकर आदी उपस्थित होते.

तसेच राजेश विधाते, पूनम विधाते, विजय मुरकुटे, यश ताम्हाणे, नितीन शिंदे, अनिल दातार व इतर शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालसाठी शुभेच्छा व आशीर्वाद देऊन त्यांचे अभिनंदन केले.