July 17, 2024

Samrajya Ladha

शिवम सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ तसेच इतर योजना नोंदणी करण्याची सुविधा..

सुतारवाडी :

राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्यानंतर महिला भगिनींनी त्यासाठी अर्ज भरण्यासाठी मोठी अडचण होत आहे म्हणुनच शिवम सुतार यांच्या वाढदिवसानिमत्त ६ व ७ जुलै रोजी सकाळी १० ते ५ दरम्यान सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी भागातील महिला लाभार्थींना ऑनलाइन अर्ज करण्याची सोय जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध करून दिली आहे. तसेच इतर योजना फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाढदिवस साजरा करत असताना तो सामाजिक उपक्रमातून साजरा केला जावा म्हणून महिला भगिनिंसाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ सह विविध प्रकारच्या शासकीय योजना साठी अर्ज भरण्याची सोय तसेच मतदार नाव नोंदणी आधार कार्ड दुरूस्ती या व्यवस्था उपलब्ध करुण दिल्या आहेत. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा हि विनंती : शिवम सुतार (माजी स्वीकृत नगरसेवक)