July 17, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथील अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यांचल हायस्कूलतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न..

बाणेर :

“विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास नाव नेई पैलतीरी दया सागरा ! प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा” ही उक्ती सार्थ करत अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे येथील विद्यांचल हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी यावर्षीही दहावी बोर्डाच्या परीक्षेत १००% निकालाची परंपरा कायम ठेवली. दि. ५ जुलै २०२४, रोजी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यांचल हायस्कूलतर्फे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा. श्री. अशोक मुरकुटे, कार्यकारणी सदस्य माजी नगरसेविका माननीय रंजनाताई मुरकुटे, सौ श्वेता मुरकुटे, सौ योगिता बहिरट, उपस्थित होते तसेच योगीराज पतसंस्थेचे संस्थापक/अध्यक्ष माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, वासुदेव भट्टाचार्य, कॅप्टन अजित ठोसर, अशोक रानवडे सर, दत्तात्रय गणगे, डॉ. आर टी वझरकर, गोविंदराजे निंबाळकर, सातरस सर , रेखा जाधव व जयेश मुरकुटे इ मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
1. कु. निहारिका वानखेडे हिने ९६.४% मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ती इंग्लीश, हिंदी, गणित व समाजशास्त्र या विषयांतही प्रथम आली.
2. कुमारी नीलम बेरवाल हिने ९५.६०% मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. तीही हिंदी व गणित या विषयांत प्रथम आली.
3.कुमारी सेजल ठिगळे ९४.२०% मिळवून शाळेत तिसरा आला. त्याने जर्मन विषयात पूर्ण गुण मिळवले.
4. कुमारी सुखदा मारटकर ९४ % मिळवून चौथी आली.
5. कुमार अमोघ तापकिरे ९३% मिळवून पाचवा आला व विज्ञान आणि मराठी या दोन्ही विषयात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.

नीलम बेरवाल हिने सामाजिक शास्त्र आणि हिंदी विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तसेच सुर्वी मठ ही इंग्लिश मध्ये प्रथम आलेली आहे. निहारिका वानखडे गणित या विषयात प्रथम आलेली आहे. प्रथमेश वाकचौरे गणित या विषयांमध्ये प्रथम आलेला आहे व श्रेया घाईतिडक हिने जर्मन विषयांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.

ज्ञानेश्वर बालाजी मुरकुटे विद्यालयाचा निकालही उत्तम लागला. तेथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा. श्री. अशोक मुरकुटे सर , श्री ज्ञानेश्वर तापकीर व श्री गोविंद राजे निंबाळकर सर यांनी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेच्या समन्वयक सौ पूजा आरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम व शिक्षकांचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टींमुळे विद्यांचल हायस्कूलचा विद्यालयाचा निकाल उत्तम लागला.