July 17, 2024

Samrajya Ladha

पाषाण मध्ये सुरू होणार इयत्ता 9 वी ते 12 वी शिक्षण वर्ग, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या प्रयत्नांना यश..

पाषाण :

पाषाण येथे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांच्या पाठपूराव्यामुळे व महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री यांच्या आदेशामुळे संत तुकाराम शाळेलगत माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता 9 वी ते 12 वी शिक्षण वर्ग सुरु होत आहे. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांची फार मोठी गैरसोय दूर होणार आहे.

आपल्या परिसरातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक(इयत्ता 9 वी ते 12 वी) शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. म्हणून 2014 पासुन सतत शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून शिक्षणाप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून इयत्ता 9 वी ते 12 वी शिक्षण वर्ग सूरु व्हावे यासाठी प्रयत्न करत होतो. आज त्या प्रयत्नांना यश मिळत आहे हि आनंदाची व अभिमानाची बाब आहे. खूप आतुरतेने याची वाट पाहत होतो : प्रमोद निम्हण(माजी नगरसेवक)

पाषाण भागात अनेक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना यामुळे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे. संत तुकाराम शाळेलगत इमारतीशेजारी ही शाळा सुरू होत असून भव्य मैदानही उपलब्ध होणार आहे. एक माजी विद्यार्थी म्हणून प्रमोद निम्हण यांचे प्रयत्न यशस्वी झाले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळणार असून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. अभ्यास करून शिक्षण पूर्ण करण्यास चालना मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री.राजेंद्र भोसले साहेब,अतिरिक्त आयुक्त श्री.रवींद्र बिनवडे साहेब,माध्यमिक शिक्षण प्रमुख श्रीमती उबाळे मॅडम आणि पुणे महानगरपालिका प्राथमिक,माध्यमिक (शिक्षणविभाग) टीमचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी आभार व्यक्त केले.