September 19, 2024

Samrajya Ladha

ज्युनिअर आय. ए. एस स्पर्धेत पेरीविंकलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

बावधन :

शालेय जीवनात शालेय अभ्यासक्रमा बरोबरच बाकीच्या परीक्षा देऊन विद्यार्थ्यांची सर्वच विषयातील अभ्यासाची तयारी करून घेणे, आणि त्यांच्यात अभ्यासाची रुची निर्माण करणे अशा दुहेरी हेतूने पेरीविंकल शाळा समुहातील पिरंगुट शाखेने ज्युनिअर आय. ए. एस स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. सुमारे ६ महिने संबधितांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांनी दिलेल्या परीक्षेत त्यांना उज्ज्वल यश मिळाले.

या यशामागे पेरीविंकलचे व्यवस्थापन, शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहेनत या त्रिसूत्रीचा महत्वाचा वाटा आहे.
अभ्यास, अभ्यासेतर पूरक उपक्रम, क्रीडा, कला अशा सर्वागीण विकासास पूरक वातावरण हेच पेरीविंकलचे प्रमुख उद्दिष्ट आजच्या या बक्षीस वितरण समारंभांतून दिसून आले. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आली.

पेरीविंकल समूहाचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिक रेखा बांदल मॅडम यांच्या प्रेरणेतून या शालापूरक उपक्रमाची संकल्पना मुख्याध्यापक डॉ. अभिजित टकले यांची होती, तर यासाठी माध्यमिक पर्यवेक्षिका पूनम पांढरे, प्राथमिक पर्यवेक्षिका सना इनामदार तसेच संबंधीत विषय शिक्षक यांनी आपापले योगदान दिले. अशा कामासाठी लागणारे व्यवस्थापन सदस्यांचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग उल्लेखनीय म्हणायला हवा.