November 21, 2024

Samrajya Ladha

पंढरपूर यात्रे साठी परिसरातील शेकडो भाविक रवाना, बालवडकर परिवाराचे ३० वर्ष वारकरी सेवेचे नियोजन..

बालेवाडी :

दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजय बालवडकर, नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर व राहुलदादा बालवडकर यांच्या वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

आपल्या परिसरामध्ये सांप्रदायिक क्षेत्रात फार मोठा वावर असल्याने पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यास भाविक आतूर असतात. आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या वारीदरम्यान पंढरपूर यात्रेस फार मोठे महत्त्व असल्याने भाविकांची पंढरपूरला जाण्याची इच्छा बालवडकर परिवाराने सलग ३० वर्ष जपली आहे.

यावेळी विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी या यात्रेत ६५० भाविक सहभागी झाले. माऊलीचे नामस्मरण करून मोठ्या भक्तिभावाने व पवित्र वातावरणात सदर यात्रा १२ बसेसच्या माध्यमातुन पंढरपूर नगरिकडे रवाना झाले. विठ्ठल-रखुमाईच्या गजरात संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमला.