पुणे :
औंध, बाणेर, बालेवाडी व्यापारी संघटनेच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूर कडे विठू माऊलीच्या भेटीला जात असताना पालखी सोहळ्यात असणाऱ्या सर्व दिंड्या आणि सोबत असणाऱ्या वारकऱ्यांना खाद्यपदार्थ (राजगिरा वडी शेंगदाणा लाडू उपासाचा चिवडा. त्याचबरोबर बिस्किटे) व 900 बॉक्स पाणी वाटप करण्यात आले.
व्यापारी संघटनेच्या वतीने दरवर्षी पालखी सोहळा दरम्यान वारकऱ्यांची सेवा केली जात असते. गेले पंधरा वर्षे हा उपक्रम राबविला जातो.
यावेळी व्यापारी संघटनेचे प्रकाश तापकीर, भवरलाल चौधरी, पन्ना राम काग, वरदाराम भायल, जेठाराम गेलोत, दलपत सोयल यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची सेवा केली.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी