November 21, 2024

Samrajya Ladha

वामा वुमन्स क्लबच्या ‘वारकरी सेवा’ उपक्रमांस बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे येथील ६८ सोसायट्यांचा सहभाग..

बाणेर :

पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची ऐतिहासिक आणि धार्मिक यात्रा आहे. वारी दरम्यान लाखो भाविक एकत्र येऊन विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. याच निमीत्ताने वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या पुनम विशाल विधाते यांच्यावतीने ‘वारकरी सेवा’ हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमांतर्गत बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे या विभागातून तब्बल 68 सोसायटींनी सहभाग नोंदविला.

‘वारकरी सेवा’ या उपक्रमांतर्गत गोळा केलेले धान्य वारीतील दिंडी प्रमुखांच्या हातात योग्य पद्धतीने सुपूर्त करण्यात आले आहे. समाजाच्या एकात्मतेचा आणि सेवाभावाचा हा अनोखा उत्सव आपण सर्वांनी एकत्र येऊन साजरा केला. सर्व सहभागी सोसायट्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन : पूनम विशाल विधाते (अध्यक्ष वामा वुमन्स क्लब

वामा वुमन्स क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रमांना सुरुवात झाली असून पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीस निघालेल्या वारकऱ्यांची सेवा घडावी म्हणून सोसायटी मधील नागरिकांना बरोबर घेत ‘वारकरी सेवा’ हा उपक्रम राबविला गेला.