बाणेर :
पुणे पिजन(Pigeon)मित्र असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा रविवारी बाणेर येथील धनकुडे फार्म येथे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राहुल दादा बालवडकर, (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे) यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला. क्लबचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव सेक्रेटरी सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते.
पुणे पिजन(Pigeon)मित्र असोसिएशन तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत सलग तीन वर्ष बालेवाडी येथील शशिकांत बालवडकर यांच्या करण लॉफ्ट(कबूतर टीम) ने प्रथम क्रमांक पटकवला आहे. त्याबददल त्यांना होंडा ॲक्टिवा गाडी बक्षीस देण्यात आली, या स्पर्धेचे दुसरे बक्षीस सुनील अलकुंटे व तिसरे बक्षिस स्वप्निल दळवी यांना मिळाले. ही स्पर्धा मध्य प्रदेश (सतना)ते पुणे अशी 1000 किलोमीटर ची रेस होती.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!