September 19, 2024

Samrajya Ladha

“आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” या उपक्रमातून लहू बालवडकर सोशल वेलफेअरची यावर्षी देखील वारकऱ्यांची सेवा

पुणे :

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीनिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने मोफत पंढरीच्या विठुरायांना भेटण्यास जाण्यासाठी पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य सेवेची वारी’ या रुग्णवाहिकेचे आयोजन करण्यात आले. या रुग्णवाहिकेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करत ही रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी त्यांच्या मोफत आरोग्य साठी सज्ज करण्यात आली.

विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी बांधव पाई पंढरपूर पर्यंत जातात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या मागचा हेतू आहे. वारीसाठी जाणाऱ्या तमाम वारकरी बांधवांनी याचा मोफत लाभ घ्यावा हि विनंती : लहू बालवडकर (सचिव भाजपा पुणे शहर)

लहू बालवडकर यांनी नेहमीच वारकऱ्यांची काळजी घेण्यासाठी “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमातून नागरिकांची सेवा करण्यास तो नेहमीच अग्रेसर असतो : चंद्रकांत पाटील(उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र)

वारकऱ्यांची सेवा करत त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांची वारी उत्तम आरोग्य राखत पुर्ण व्हावी हा चांगला उद्देश उराशी बाळगून मोठ्या श्रध्देने आणि निष्ठेने दरवर्षी “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” हा स्तुत्य उपक्रम राबवत कौतुकास्पद काम करत आहे : मुरलीधर मोहोळ (केंद्रिय राज्यमंत्री)

यावेळी भाजपा कोथरुड विधानसभा दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला तसेच लहू बालवडकर सोशल वेलफेअर चे कार्यकर्ते आणि मित्र परिवार उपस्थित होते.