November 22, 2024

Samrajya Ladha

बाणेर, म्हाळुंगे येथील आरोग्य कोठी मध्ये अंत्यविधी साठी स्मशान परवाना(मयत पास) मिळावा ज्योती कळमकर यांचे सहाय्यक आयुक्तांना पत्र..

बाणेर :

आयुष्यमान आरोग्य मंदिर ( आरोग्य कोठी ) बाणेर, म्हाळुंगे येथे अंत्यविधी साठी स्मशान परवाना(मयत पास) उपलब्ध होऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी म्हणून माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या वतीने औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त यांना लेखी पत्र पाठवून मागणी केली आहे.

माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, गेल्या दोन महिन्यापूर्वी पुणे मानपाच्या माध्यमातून आयुष्यमान आरोग्य मंदिर (आरोग्य कोठी) बाणेर म्हाळुंगे येथे बाणेर गावठाण लगत, प्राईम पनाश सोसायटी शेजारी व म्हाळुंगे गावठाण लगत सुरू झाले असून तेथे २४ तास अंत्यविधीसाठी लागणारा स्मशान पास (मयत पास) उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय दूर केली पाहिजे. नागरिकांना बऱ्याचदा रात्री अपरात्री अंत्यविधी साठी आवश्यक मयत पास मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. म्हणुनच नागरिकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून त्वरित मयत पास मिळण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.