May 17, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

बावधन :

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगाने स्वीकारलेल्या 21 जून या जागतिक योग दिनानिमित्ताने दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन, भारतीय योग संस्थान(पंजी) व ऋग्वेद योगा यांच्या संयुक्त विद्यमाने छ.संभाजी महाराज क्रीडांगण, एलएमडी चौकम बावधन येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये योगासने, ऋग्वेद योगा संस्थेच्या माध्यमातून योगाधारित नृत्याविष्कार सदर करण्यात आला.

 

यावेळी बावधन परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय आणि पुणे महानगरपालिका शाळा १५३ बी, ८२ बी चे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते योग गुरु सौ.आशा कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांपासून बावधन भागामध्ये योग वर्ग सातत्याने घेतले जात आहेत.योग हा संतुलित जीवन जगण्याचा संपन्न आणि सुलभ मार्ग आहे. ज्यातून मनाला आणि शरीराला ऊर्जा मिळते. सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली असलेल्या योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया असा निश्चय करण्यात आला.

योग दिनाच्या निमित्ताने योगगुरूंचा सन्मान नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी योग दिनाचे महत्त्व पटवून यशस्वी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे योग असल्याचे सांगून सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या !