March 22, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील श्री खंडेराय प्रतिष्ठान, शैक्षणिक संकुलचा 37 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..

बालेवाडी :

बालेवाडी येथील श्री खंडेराय प्रतिष्ठान, शैक्षणिक संकुलचा 37 वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा झाला.
श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या सी एम इंटरनॅशनल स्कुल च्या ध्रुव ठोंबरे आणि पूर्वा शहारे ह्या विद्यार्थ्यांनी सूत्र संचालन केले, 1988 साली विद्यार्थिनीना बालेवाडी बाहेर जाऊन शिक्षण घेण्यासाठी येत असलेले अडथळे पाहून श्री गणपतराव बालवडकर यांनी स्वतः च्या राहत्या घरात शाळा सुरु केली आणि आज श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेत के.जी. टू पी एच.डी.पर्यंत विविध कोर्सेस मध्ये विद्यार्थी प्रविण्य मिळवत आहेत.

 

विद्यार्थी केंद्रित ह्या शिक्षण संस्थे मध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा साठी अत्याधुनिक यंत्र सामुग्री बरोबरच कला, क्रीडा आणि इतर स्पर्धा परीक्षाना तेवढेच प्राधान्य दिले जाते, ह्या प्रसंगी शैक्षणिक तसेच इतर कला, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षामध्ये विशेष नैपुण्य मिळवलेल्या विदयार्थ्यांचे सत्कार करण्यात आले त्याच बरोबर सी एम आय एस च्या आणि ज्ञानसागर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स विदयार्थ्यांनी अतिशय सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विश्वजित सागर बालवडकर ह्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याने अतिशय सुरेख पद्धतीने संस्थेत चालू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती नाटुकली च्या माध्यमातून दिली.

सदर प्रसंगी शिक्षक वृंदाला मार्गदर्शन पर आभार व्यक्त करताना, पुढील पिढी उत्तम घडवायची असेल तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उत्तम आणि परिपूर्ण शिक्षण दिले गेले पाहिजे असे मत सचिव डॉ सागर बालवडकर यांनी व्यक्त केले.

संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर यांनी सर्व शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रत्येक माणूस महत्वाचा असतो म्हणून माणुसकी जपली पाहिजे असेही सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी श्री सतीश गंधे, ॲड. माशाळकर, श्री लक्ष्मण बालवडकर, श्री प्रकाश बेंद्रे, वरिष्ठ पी आय सीताराम दुबल, श्री विजयराव कोलते. श्री दिलीप फलटणकर, उपसंचालक शिक्षण विभाग श्रीराम पानझाडे, प्रोफेसर रुपाली सागर बालवडकर इत्यादी उपस्थित होते.