September 19, 2024

Samrajya Ladha

म्हाळुंगे-बालेवाडी येथे अमोल बालवडकर आयोजीत पुणे शहरातील सर्वात मोठा योग दिन उत्साहात साजरा..

म्हाळुंगे-बालेवाडी :

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि अमोल बालवडकर फाऊंडेशन यांच्या वतीने बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे आज पुणे शहरातील सर्वात मोठा योग दिन २००० नागरीकांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा झाला.

या उपक्रमात तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने करण्यात आली आणि आपल्या आरोग्यासाठी योग करणे किती महत्वाचे आहे, याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमात बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे परिसरातील व पुणे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, सहसंचालक श्री. सुधीर मोरे, उपसंचालक श्री. सुहास पाटील, नगरसेविका सौ. ज्योतीताई कळमकर, सौ. स्वप्नालीताई सायकर, श्री. प्रकाशतात्या बालवडकर, श्री. गणेश कळमकर, उपसंचालक श्री. संजय सबनीस, उपसंचालक श्री. उदय जोशी, सहाय्यक संचालक श्री. मिलिंद दिक्षित, सहाय्यक संचालक सौ. भाग्यश्री बिले, लेखाधिकारी सौ. दिपाली बोराडे, श्री. सुभाष भोळ, नवचैतन्य हास्य योग सदस्य आदींसह अमोल बालवडकर फाऊंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.