August 28, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

जागतिक किडनी कॅन्सर दिवस ! किडनी कॅन्सर चे वेळीच निदान व उपचार आवश्यक.. युरोकुल हॉस्पिटल बाणेर

बाणेर :

आपण कायम स्तनाचा कर्करोग,तोंडाचा कर्करोग ह्या विषयी वाचतो जनजागृती होते .परंतु किडनी चा कर्करोग पण खूप प्रमाणात आढळतो .परंतु विशेष माहिती नसल्यामुळे निदान करण्यास उशीर होऊ शकतो. किडनी उजवी व डावी हा अवयव आपल्या शरीरातील रक्त फिल्टर करून त्यातील अनावश्यक गोष्टी बाहेर टाकण्यासाठी खूप आवश्यक अवयव आहे.

 

ह्या किडनी च्या पेशी मध्ये कॅन्सर ची सुरवात होते.
आपल्या लघवीतून रक्त येत असेल, कुठल्याही कारणाशिवाय वजनात घट होत असेल, दुखणे इत्यादी लक्षणे आढळल्यास आपल्या तज्ञ डॉ चां सल्ला घ्यावा, तपासण्या कराव्यात. योग्य वेळी निदान झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया, टार्गेट किमोथेरपी उपचार पद्धती उपलब्ध आहे.

तंबाखू, गुटखा,धूम्रपान सेवन टाळावे. रक्त लघवी तपासणी,सोनोग्राफी करून किडनी ची तपासणी करून घ्यावी. अशी माहिती किडनी तज्ञ डॉक्टर नी दिली

बाणेर येथे जागतिक सुप्रसिध्द युरो सर्जन डॉ संजय कुलकर्णी व डॉ ज्योस्ना कुलकर्णी यांचे युरोकुल हॉस्पिटल हे किडनी उपचारचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे व आधुनिक तंत्रज्ञान रोबोट इत्यादी असलेले सेंटर आहे. युरोकुल येथे डॉ. सुहास मोंढे हे नेफरोलॉजिस्त किडनी तज्ञ आहेत.
8459170718