June 25, 2024

Samrajya Ladha

चंद्रकांतदादा पाटील यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने २६५ वृक्षांचे रोपण..

सोमेश्वरवाडी :

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात ६५ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. याच भावनेतून १० जून २०२४ रोजी, दादांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, ९ जून २०२४ रोजी, सकाळी ७:३० वाजता फुलपाखरू उद्यान सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी सोशल फाउंडेशनच्या वतीने २६५ झाडे लावण्यात आली.

आमचे मार्गदर्शक कोथरूडचे आमदार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी एक वेगळा आदर्श घडवत सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो. याच अनुषंगाने त्यांनी केलेल्या 65 हजार वृक्ष रोपण करण्याच्या संकल्पास हातभार म्हणून वृक्ष रोपण करण्यात आले. हाच उत्साह असाच कायम राहून 65000 झाडे लावण्याचा संकल्प लवकरच पूर्ण होईल हीच अभिलाषा. : सचिन दळवी ( सरचिटणीस भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल)

दादांच्या या संकल्पास पूर्णत्वास नेण्यासाठी या मोहिमेत भाजपा नेते प्रकाश तात्या बालवडकर, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, मधुकर दळवी,तारामण जाधव, राहुल शिंदे व सचिन दळवी मित्र परिवार सहभागी झाले होते.