June 25, 2024

Samrajya Ladha

सोमेश्वर फाउंडेशन तर्फे विक्रमी 1069 जणांचे रत्तदान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

पुणे :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थान, सोमेश्वर फाउंडेशन, विठ्ठल सेवा मंडळ यांच्या माध्यमातून सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी, पाषाण (पेठ जिजापुर) या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी रविवार (ता.९) जून केले होते. शिबीराचे उदघाटन सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष पोपटराव जाधव, गोविंद रणपिसे, मनोहर आरगडे, वाडेश्वर सुतार, उमेश वाघ, पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबा तारे, ज्ञानेश्वर पारखे यांच्या हस्ते करण्यात आले.

आयोजक, माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले, “आजपर्यंत या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराच्या तूलनेत या वर्षी १०६९ ऐवढे विक्रमी रक्त संकलन झाले. पुणे शहर व जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, यामुळे अनेकांचे प्राण वाचतील. नातं रक्ताचं शिवभक्तांचं ! हे ब्रीदवाक्या घेऊन दरवर्षी शिबीराचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी मागील वर्षाच्या तूलनेत रक्तदानासाठी शिवभक्तांचा वाढता सहभाग दिसून येतो. या मधून सामाजिक जाणीव रूजत असल्याचे दिसून येते.” रक्त संकलन ‘अक्षय रक्त केंद्राच्या माध्यामातून करण्यात आले.

यावेळी औंध विशस्त मंडळाचे राहुल गायकवाड, योगेश जुनवणे, महेद्र जुनवणे, गिरीश जुनवणे, हेरंभ कलापूरी, सुप्रीम चोंधे, माजी स्विकृत नगरसेवक वसंतराव जुनवणे, शिवम दळवी, माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड, आबासाहेब सुतार, संजय निम्हण, संतोष तोंडे, यांच्यासह शिवभक्तांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.