December 5, 2024

Samrajya Ladha

औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत(आयटीआय) तर्फे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर..

औंध :

राज्य सरकारच्या औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत(आयटीआय) छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज सोमवार (ता.१०)रोजी सकाळी दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये करिअर विषयक मार्गदर्शनपर व्याख्याने, सचित्र प्रदर्शन,आयटीआय कोर्स व पुढील शिक्षणा संदर्भातील माहिती,१०,१२ वी नंतरचे अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात येणार आहे.

तसेच शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती विषयी माहिती, परदेशातील शिक्षण, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ संदर्भातील व स्वयंरोजगाराबाबत माहिती देणारे स्टॉल याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. प्रामुख्याने इयत्ता १० वी ,१२ वी नंतर करिअर कसे निवडावे? शिक्षणाच्या विविध संधी कशा उपलब्ध होऊ शकतील? यासाठी देखील मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत.या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाकरीता पुणे शहरामधील शिवाजीनगर, कसबा, पर्वती, खडकवासला या मतदार संघाचे आमदार, माजी नगरसेवक, विविध पदाधिकारी, विविध खात्यातील वरीष्ठ अधिकारी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

इयत्ता ,९ वी ते १२ वी परिक्षा दिलेल्या उमेदवारांसह पालक व शिक्षकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर.बी. भावसार यांनी केले आहे.

शिबीर कुठे व कधी होणार?

ठिकाण :- भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी सभागृह, औंध, बॉडी गेट बस स्टॉप जवळ, औंध गाव, औंध, :- १० जून सोमवार:-
दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

You may have missed