June 25, 2024

Samrajya Ladha

पाषाण येथे “तुळसाबाई कोकाटे संस्मरणीय मास्टर ब्लास्टर्स ट्रॉफी 2024” स्पर्धेत कोकाटे स्पोर्ट्स अकादमीने पटकाविले विजेतेपद..

पाषाण :

पाषाण येथे कोकाटे स्पोर्ट्स अकादमीच्यावतीने  “तुळसाबाई कोकाटे संस्मरणीय मास्टर ब्लास्टर्स ट्रॉफी 2024” 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कोकाटे स्पोर्ट्स अकादमी संघाने HK CA(U12)  संघाचा ३ (dls method) धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे. आयोजक अनिल कोकाटे आणि सहकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा यशस्वी झाली.

अंतिम सामने मध्ये युवान हंसालीया याचे अर्धशतक आणि आरव नन्ना यांच्या फलंदाजीच्या जोरावर निर्धारित २५ षटकात ७ बाद १५९ धावा केल्या तर HK CA(U12) संघाने संघ पाठलाग करताना २२ षटकात ३ बाद १३१ धावांपर्यंत मजल मारता आली. अवघ्या तीन धावांनी कोकाटे स्पोर्ट्स अकादमी संघाने विजेतेपद पटकावले. पराभूत संघाकडून शौर्य कांबळे४३(६६), सोमील सकपाळ ३७(३१)आणि ईशान शेळके२७(१९) यांचे प्रयत्न कमी पडले. गोलंदाजीत कोकाटे स्पोर्ट्स अकादमीकडून आरव नन्ना आणि शौर्य गायकवाड तर HK CA(U12) संघाकडून ईशान शेळके याने चांगली गोलंदाजी केली.

या स्पर्धेत बेस्ट बॅटर विवान हंसालिया

बेस्ट बॉलर पार्थ वर्भे

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी कोकाटे अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक अनिल कोकाटे, महाराष्ट्राचे हेमंत किणीकर, भास्कर कोकाटे, प्रसाद पेंडसे, आणि प्रशिक्षक शंकर पवार उपस्थित होते.