औंध :
बाणेर, बालेवाडी, सूस, महाळुंगे परिसरातील नाले व पावसाळी लाईनची साफसफाई व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या पुनम विशाल विधाते यांनी क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची भेट घेत निवेदन दिले. पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
निवेदनामध्ये पुनम विधाते यांनी सांगितले आहे की, पहिल्याच पावसामध्ये बाणेर बालवाडी सूस, महाळुंगे येथे पावसाचे पाणी साठल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. पावसाळा सुरू होत असल्याने आपण सदर परिसरातील नाले व सांडपाणी व्यवस्था याची पाहणी करून त्याची साफसफाई करून घेणे गरजेचे आहे.
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील नागरिकांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पहिल्याच पावसात पाणी साठल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न उद्भवला आहे. पावसाळा सुरु होत असल्याने, परिसरातील नाले व सांडपाणी व्यवस्थेची साफ सफाई लवकरच केली जाईल.
1. नाले व पावसाळी लाईन ची साफ सफाई.
2. पाणी वाहून जाण्याची सोय सुनिश्चित करणे.
3. प्रमुख रस्ते आणि आयटी पार्क कनेक्टिंग रस्त्यांवर विशेष लक्ष.
नागरिकांचे सहकार्य आणि पाठिंबा आम्हाला उत्तम सेवा देण्यासाठी प्रेरणा देतो. पावसाळ्यात तुमच्या सुविधा आणि सुरक्षेला आमची सर्वोच्च प्राधान्य आहे – पूनम विशाल विधाते (राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या/अध्यक्ष वामा वुमेन्स क्लब)
बाणेर, बालेवाडी हा परिसर प्रमुख रस्ते आयटी पार्क ला जोडणारा असल्याने या परिसरात वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. पाऊस दिवसभर राहिला तर संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर येथे खूप वाहतूक कोंडी होते. आता पावसामुळे ही समस्या अधिकच वाढणार असून परिसरातील विविध नाल्यांमध्ये राडारोडा पडलेला असल्याने पाणी वाहत नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यासाठी पालिकेकडून योग्य नियोजन करण्यात यावे अशी विनंती राष्ट्रवादीच्या नेत्या पूनम विधाते यांनी औंध क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना केली.
औंध क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन योग्य नियोजन करून पावसाळी कामे मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले