बालेवाडी:
सम्यक संकल्प संचालित मातृछाया बालगृह, दिघी येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन विविध सामाजिक आणि मनोरंजक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. राजाभाऊ गुडदे फाउंडेशन, बालेवाडी यांच्या वतीने बालगृहातील मुलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे यांच्या मार्गदर्शनाखाली बालगृहातील मुलांना शालेय साहित्य, खेळाचे साहित्य, खाऊ तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच मुलांसाठी विविध मनोरंजक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत गरजू मुलांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. फाउंडेशनच्या या उपक्रमाला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगीत गुडदे, अनिमेष गुडदे, धनंजय गवारे, दर्शना गवारे, गोरल गवारे, ब्रह्मदेव मोहन भांडवलकर, गोपाल खडसान, स्वप्नील जैन, दीपक कर्डेल, अमरदीप खराडे, सुप्रिया पारखे, अभिजीत व्यवहारे, शैलेश राजहंस, स्वप्निल दसाळ, सिद्धेश जोशी, ईशान रस्तोगी, विपुल शिंदे, पराग केळकर, दिनेश खरे, नितिन अग्रवाल, योगेश मयंकर, देविदास श्रीबास, कुलदीप देसाई, ऋषिकेश गिनाहीकर आणि विक्रांत देशमुख यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मातृछाया बालगृहाच्या वतीने अध्यक्षा किरण गुडदे तसेच राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. सामाजिक जाणीव आणि सेवाभावातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे बालगृहातील मुलांच्या आनंदात भर पडली.



More Stories
ममता चौकासह बाणेर-बालेवाडीतील पाच चौकांत सिग्नल यंत्रणा; चार दिवसांत कार्यान्वित होणार, नगरसेवक अमोल बालवडकरांचा पुढाकार
*पेरीविंकल च्या बावधन, सूस, पिरंगुट,पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी!!!*
सत्य, अहिंसा आणि देशसेवेचा संदेश; पेरिविंकल स्कूलमध्ये महात्मा गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी