October 3, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सत्य, अहिंसा आणि देशसेवेचा संदेश; पेरिविंकल स्कूलमध्ये महात्मा गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

पिरंगुट :

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सत्य, अहिंसा, साधेपणा, शिस्त, स्वावलंबन आणि देशसेवेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांची वेशभूषा साकारून त्यांच्या साध्या आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे सुंदर दर्शन घडविले. तसेच गांधीजींच्या तीन माकडांच्या माध्यमातून ‘वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका’ हा मौलिक संदेश विद्यार्थ्यांनी सादर केला.

या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. बांदल मॅडम, संचालिका शिवानी बांदल मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभारी शिक्षिका पल्लवी मॅडम, सना मॅडम आणि रुपाली मॅडम यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांची तसेच जीवनकार्याची ओळख झाली. सत्य, अहिंसा, साधेपणा, शिस्त, देशप्रेम आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आले.

अशा प्रकारे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.