बालेवाडी :
राजाभाऊ गुडदे फाउंडेशन व भारती विद्यापीठाच्या,भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल, बालेवाडी, पुणे-४५ या शाखेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर २०२६ मध्ये ‘ई-वेस्ट मॅनेजमेंट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक व संगणकीय कचऱ्याचे संकलन, योग्य व्यवस्थापन व शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. ई-वेस्टची योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्यास पर्यावरणाचे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संवर्धन व सुरक्षिततेस हातभार लागतो, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
भारती विद्यापीठाचे कार्यवाहक मा. डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाच्या शालेय विभागाच्या अध्यक्षा मा. विजयमालाजी कदम तसेच भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक मा. डॉ. अस्मिता ताई जगताप यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी घरातील वापरात नसलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य, संगणकीय उपकरणे व इतर ई-कचरा शाळेत जमा केला.
राजाभाऊ गुडदे फाउंडेशन यांच्या सहकार्याने ई-वेस्ट मॅनेजमेंट तसेच इलेक्ट्रॉनिक व संगणकीय कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच संकलित ई-कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावावी, याबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.किरण गुडदे आणि मा. श्री. संगीत गुडदे यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या उल्लेखनीय सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मा. भावना राय यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या सौ. स्वप्ना फडणवीस आणि श्री. दत्तात्रय चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थेच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापराची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या सौ. स्वप्ना फडणवीस आणि श्री. दत्तात्रय चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच साहिति तुम्मेपल्लि, ब्रह्मदेव भांडवलकर, अनिमेष गुडदे, खंजन मंकड, गौरी जोशी, स्मिता ताटे, राधिका होगले, ज्ञानेंद्र सिंह, धनंजय पुजारी, प्रदीप डोंगरे, अतुल भिडे व इतर सहकाऱ्यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थेच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापराची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.



More Stories
ममता चौकासह बाणेर-बालेवाडीतील पाच चौकांत सिग्नल यंत्रणा; चार दिवसांत कार्यान्वित होणार, नगरसेवक अमोल बालवडकरांचा पुढाकार
*पेरीविंकल च्या बावधन, सूस, पिरंगुट,पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी!!!*
सत्य, अहिंसा आणि देशसेवेचा संदेश; पेरिविंकल स्कूलमध्ये महात्मा गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी